पान:आकाशगंगा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहतो मीन तो जैसा पाण्यावरी। ग मज्जीव तसा हा तगेल तूझ्यावरी । ग तव सानिध्यानें स्वर्गहि पृथ्वीवरी। ग जा पण आतां - थांबुं नको तूं एकहि क्षण यापुढे वेळ ती सांगुनि येत न गढे ! -- उभी अजूनी सांग कशाला ? जा ग झणीं साजणी असे तो 'रेक्टर' अमुचा 'मुनी' ! सवंगडी ते येतिल आतां - येथ तुला पाहुनी- • करतिल 'षष्ठी' माझी कुणी ! हेतु कांहिंसा धरून आलिस जरि तूं माझ्याकडे जिवाला पडलें मज सांकडें ! लाविलें वेड तूं पुरतें माझ्या मनां । ग हें इंगित आतां कळेल बंधूजनां। ग मी कुठवर सोसूं हृदयाच्या वेदना | ग सहवासास्तव होशिल माझी जेव्हां तूं सहचरी भ्यास हा नुरेल हृदयांतरीं ! प्रकाशन – सत्यवादी - ६० - - -