पान:आकाशगंगा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उंच झालों म्हणून- झालों उंच म्हणून मी मज किती तो त्रास होतो बरें ? सांगू का समजावुनी पण कुणा वाटेल ते का खरें ? आढ्याचे मम मस्तकास बसती दारांत ठोके सदा गेलों वांकुनि मी तरी न टळते ती दारुणा आपदा ! एरंडासम उंच पाहुनि मला माझ्या स्वतःच्या घरीं जो जो तो उठतो निरर्थ मज घे राबून कैद्यापरी ! 6 ‘ काढा जिन्नस ते फळीवरुनियां ठेवून द्या नी पुन्हा ऐशा सक्त मजूनें रखढण्या केला जणूं मी गुन्हां । बाजारों मिळतें न रुंद मजला कोठें कधीं धोतर जें जें नेसुनि पाहतां न पुरुनी तें येइ गुध्यावर ! जेव्हां मी बसतों पुढे कधिंकधीं नाट्यगृहाच्यामधें माझेमागिल सर्व लोक चिडुनी देती बसूं ना सुर्धे ! तोटा आणिक भासतो हरघडी उंचीमुळे जो मला सांगूं का अपमान सर्व गिळुनी ? हा जीव वैतागला ! लाभे स्त्री मज ठेंगणी तिजपुढे मी सारखा वांकुन- झालों जर्जर त्यामुळे न रुचतें-' आलिंगुनी चुंबन ! वृत्त-शार्दूलविक्रीडित देवा ! मृत्यु नको कशास्तव तरी बोलो कुणी बापुडें देवा ! आयु नको तुला दिनवितों होणें जरी उंच लें !! प्रकाशन-वसुंधरा -