पान:आकाशगंगा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुष्ट काळाने तुझ्या मुखांतून अन्न कायम ना घेतलें हरून ? हाय ! आतां मी कशाला जगावें ? वृत्त ‘त्यांना' हें कस मीं कथावें ? " अभागिनिचा तो शोक दुर्निवार प्राणिमात्रांना कां न रडविणार ? दगड धोंडे जातील दुभंगून लता पुष्पेंही ढाळतिल गळून ! वृत्त कुणि हें बापास ऐकवीलें आणि त्याचं काळीज चिरुन गेलें ! रडत धांपा टाकीत घरी आला भाँळ आली पाहून लेकराला ! चार चौघांनी त्यास आंवरून घरामध्यें ठेविलें झोंपवून ! बाळ नेला दहनविधीसाठों रडत डोकें आपुलें माय फोडी ! - बाळ जाऊनी दिवस दोन तीन नाहिं झाले तो काय ये घडून ? बाप त्याचा जो खिळुनि बिछान्याला खंत खाऊनी गतप्राण झाला ! पुत्र-शोकाची आग भडकलेली जो न विझली तो काय हें कपाळीं ! वेड लागोनी हाय ती अभागी फिरत असतांना दिसे परळ-भागीं ! प्रकाशन- सत्यवादी - ५७ - ( मुंबई )