पान:आकाशगंगा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दैव केव्हां कोपेल कुणा कांहीं सांगतां तें जगतांत येत नाहीं ! गरीबांना गांजतें दैव फार सुखें खाऊं देई न घास चार ! ! बाळ जाण्याच्या ऐन धांदलीत जिन्यावरुनी घसरला पाय थेट ! पार आला चौकांत कोसळून हांक मारी 'आईस' ओरडून ! लोक आले धांवून सर्व खालीं काय त्यांनी पाहिले त्याच वेळी ! मेंदु फुटला तो पार मस्तकाचा प्राण गेला सोडून बालकाचा ! चौकिं रक्ताचा सडा लाल झाला दृश्य बघवेना तेथलें कुणाला ! भाकरी ती फडक्यांत बांधलेली उडुनि तुकडे रक्तांत माखलेली ! बाप-लेकांच्या मुखांतील घास गळुनि पढला होऊन असा हास ! माय आली धांवून, घाबरून आणि हंबरडा फोडिला; रडून !- - " कसा बाळा सोडून मला गेला ? नव्या नवसाचा एक तूंच झाला ! तुझ्या आधी मी कां न बरें मेले ? काय माझ्या हैं कपाळी लिहीले ? - -