पान:आकाशगंगा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिवस अर्धा काढीन राहिलेला पाठिराखा तो देव गरीबांला ! घरीं आतां जाऊन तूंच येई स्वतः खाऊनी आण मला कांहीं ! वाट अपुली पाहात 'ती' असेल मी न येतां 'ती' काळजी करील ! सांग समजावून तिला तेव्हां आज माझ्या कीं नसे गोड जीवा! " वडीलांच्या घेऊन निरोपाला पोर गेला धांवून स्वगृहाला ! तीन मजली ती चाळ मजूरांची उभी माडीवर तेथ माय त्याची ! बाळ अपुला लाडका न्याहळून हृदय आनंदें तिचें ये भरून ! " कां न 'त्यांचे' जाहलें अजुनि येणें ? " विचारी ती त्याजला कौतुकान ! ‘ प्रश्न ऐसा श्रवतांच माउलीचा कंठ आळा दाटून बालकाचा ! अश्रु आले ढोळ्यांत खळखळून शब्द पडले अडखळत मुखांतून- "भाज बाबा येणार अतां नाहीं नसे त्यांच्या जीवास गोड कांहीं कसे करुनी हा दिवस लोटणार सांजकाळीं ते घरीं परतणार ! - ५४. - -