पान:आकाशगंगा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार फिरला तो पोर जागजागीं दिसुनि आला ना पिता त्यास मार्गों ! भूक त्याची हरपून घे उभारी दोन प्रहराची वेळ कठिण भारी ! जीव त्याचा जरि थकुनि फार गेला घरी जाण्याला त्यांत तो निघाला तोंच झाडाखालती त्यास कोणी प्राण दुःखी एक ये आढळोनी ! जवळ जातां दिङ्मूढ पोर झाला घाम त्याच्या अंगास सुटुनि आला ! मिठी त्यानें बापास मारियेली आणि वाचा तोंडून ही निघाली ! - " काय बाबा, जाहलें हो तुम्हांला ? उठा ! माझ्याशीं शब्द एक बोला | तुम्हां केव्हांपासून बघत आहे आणि आतां पाहतों काय मी हें ? " शब्द बाळाचे अमृतासमान ऐकतां ना होणार खूष कोण ? हृदय आर्ले उमळून त्या पित्याचें बोल पडले बाहेर कळकळीचे- - “आज माझ्या जीवास चैन नाहीं दिवस त्यांतुनि बुडवितां येत नाहीं ! पूर्ण खाडा होतांच आजचा हा उद्यां कैसें ?- जांचतो प्रश्न जीवा ! - -५३-