पान:आकाशगंगा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करुण कहाणी ऐन बाराचे ऊन कडक झाले टोल बाराचे निनादून आले परळ-गांवीं गिरणीत होइ भोंगा भाकरीची ती वेळ मजुर लोकां ! काम हातांतिल टाकुनी तसेंच मजुर गेले धांवून जेवण्यास ! भुकेने हा व्याकूळ एक पोर बघे गर्दीतुनि कुणा सभोवार ? बाप त्याचा गिरणीत कामगार वृद्ध तरि तो कामा न ऐकणार ! आज त्याच्या जीवा न गोड कांहीं कसे करुनी तो दिवस भरुनि नेई ! परी बाराची लाभतांच सुट्टी ताप भरुनी तो होइ फार कष्टी ! काम आला सोडून निराशेनें साउलीला टाकिलें अंग त्यानें ! कुणी पाहीना त्यास विचारोनी गर्क जो तो आपुल्या विचारांनीं ! पोर त्याचा धुंडीत फिरे त्याला व्यर्थ माया येईल का कुणाला ? -५२- वृत्त - दिंडी -