पान:आकाशगंगा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणेरी पगडी कवि अज्ञातवासाचें 'माझें फूल' हुंगूनच ह्या 'पुणेरी पगडी'चा स्वीकार करावा. ही पगडि राहुं द्या डोक्यावरची अजून कुणि उडवुं नका हो तिला 'पुणेरी' म्हणून ! ॥ ध्रु० ॥ चाले न 'वकीली' पुण्यांत जरि राहुनी वर्तमानपत्रीं घेतां तनु वाहुनी बनलोंच पढारी पगडी मी घालुनी पण कुणी म्हणेना दे. भ. खरा मज चुकून ! 'गांधाळ" लोक ते खादीवेषामधें तव तें तयांचें मला मुळीं नावडे मम पगडीवरती सदा फोडुनी खडे आर्पिती मला ते खादी टोपी 'टिचून' ! निर्धार परंतू निश्चित माझा असे मी पेशवाइच्या खुणेस राखीत सें सामर्थ्य पगडिचें तम्हांस सांग कसें ? ती येइ फिरवितां येतां संकट कुठून ! आहेर कितीही तुम्ही मला अर्पिले ते जतन करूनी ठेविन मी चांगले नच पगढी टाकिन तुमच्या हेक्यामुळे मी मेल्यावरती जाळा तिज कुरतडून ! (१) भोजनभाऊंच्या साहित्यपाकशाळेतील पिठल्यांत अचानक सांपडलेला हा शब्दाचा गोळा ! (२) प्रतिभासाधनाच्या धुमश्चक्रींत धुळवड उडविणारा Bomb-shell. प्रकाशन – विहार - जाति ~ बालमुकुन्द - - ५१- -