पान:आकाशगंगा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटची आशा जेव्हां टाकुनि तूं मला प्रियकरा ! गेलास देशांतरीं- झाली दुर्धर मरिस्थती धजत ना वर्णावया वैखरी ! मासोळी कुढते जळाविन जशी प्राणांप्रती अर्पुनी आली ती विरहानलें मज दशा देवावरी ओढुनी ! गेल्यापासुनि तूं प्रतिक्षण मला वर्षांपरी भासला तैसा ध्यास तुझा निरंतर हृीं लागोनियां राहिला! झाले वर्ष पुरें; तुझी परतण्या वेळा जरी पातली ना स्वरदर्शनलाभ होत म्हणुनी, माझी मती कुंठली ! नाहीं पत्र तसे तुझे अलिकडे मी रोज त्या वांछितें रात्रींच्या समयीं तुला स्मरुनियां ही चातकी स्फुंदते ! आपोआप झडे जशी कुमुदिनी चंद्रप्रभेवांचुनी मीही अंथरुणावरी खिळियलें मृत्यूमुखीं ठेपुनी ! आशा शेवटची उरे-'झडकरी व्हावें तुझे दर्शन घ्यावें आपण एकदां उभयतां आलिंगनी चुंबन ! जातो प्राण हळूहळू तरि दिला डोळ्यांत मी ठेवुन झालें ईप्सित पूर्ण मात्र म्हणजे तात्काळ तो सोडिन । ू प्रकाञ्चन —– सत्यवादी - ५० - - वृत्त - शार्दूलविक्रीडित - - -