पान:आकाशगंगा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जय बहु झाले, लग्नहि दुर्लभ, मिळे कोठुनी मज कांता १ 'घरजांवई' वा 'दत्तक ' कोणी घेइल त्या मी सिद्ध सदा ! मुग्ध-विरह परि हृदय चिरे ! पैशावरती विश्व फिरे मिळेल तो मज कसा बरें ? चैन पडेना, बघुनि पत्रिका, भविष्य; व्रत सांगा मजला उडुनी गेलें मन हें माझें, द्या हो ! कोणी काम मला ! आप्त सोयरे कोण कुणाचे ? मित्रहि शत्रू ते बनती ते 'शितेंच नसतां भुतें कोठली' ? संकटकालीं मूढ मती ! पैसा करि अन्नान्न दशा उडविल धनिकांचा फडशा करील तो ती पूर्वदिशा त्याच्यासाठी भिक्षा मागूं? अथवा बनुं का चोर भला ? उडुनी गेले मन हे माझे, द्या हो कोणी काम मला ! काय करावा उपाय सांगा, जीवहि द्यावा हाय गमे ! विचार करुनी मस्तक फिरलें, परतंत्रों जगणे न जमे ! देवाघरचा न्याय बघा कुत्रें भरतें पोट न का ? मीच रहावा काय भुका ! - हळहळ वाटे; — स्थिती न ऐशी येवो कांघेंही कोणाला ! ' उडुनी गेलें मन हें माझें, द्या हो कोणी काम मला ! प्रकाशन - विविधवृत्त -- -