पान:आकाशगंगा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैशासाठीं चाल- फटका कै. रेंदाळकरांसारखे कित्येक कवि 'प्रेमासाठी' वेडे होतात. हल्लींच्या काळांत बेकार झालेला एखादा सुशिक्षित तरुण 'पैशासाठीं' पिसाट बनून गेल्यास आश्चर्य मानण्याचे कारण तें काय ?-- आणि जगांत पैसा व प्रेम ( कनक आणि कांता ) यांचें वेड कोणास नाहीं ? ( भूमिका – बेकार, बी. ए.) पैशासाठी पिसाट झालों मिळेल कैसे पोटाला ? उडुनी गेलें मन हैं माझें, द्या हो कोणी काम मला ! ॥ ध्रु० ॥ , वणवण फिरलों गांवोगांवीं 'फर्म, ऑफिसें' धुंडियलीं 'उहेकन्सी'च्या नकारघण्टें नष्ट सकल ही तनु झाली ! चक्कर नशिबाची फिरली वृत्ती आनंदित सरली नव्हतीं व्यसनें तीं जडलीं शून्य सर्व हैं जीवित भासे, कठिण वेळ मध्यान्हाला उडुनी गेलें मन हें माझे, द्या हो कोणी काम मला !- पोपटपंची शिक्षण सारें खर्चुनि पैसा ज्ञान खुळे - पदव्या मोठ्या लक्षणि खोट्या, जीवाला नच ध्येय कळे! विपरीता झाली सृष्टी बेकारीची हो वृष्टी ! सुशिक्षित (1) मी बहु कष्टी नोकरि बघतों, धंदा बघतों, वशिला कोठें नच भिडला उडुनी गेलें मन, हे माझे, द्या हो कोणी काम मला ! -४८-