पान:आकाशगंगा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दीपज्योतिवर पतंग घालितो उडी मोहुनियां पाय तिच्या अर्पितो कुडी भ्रमर जाइ जातिवरी करुनि वंचना आतुर मी होइं तुझ्या प्रेम-दर्शना ! मैनेसम सुरुनि झुरुनि दिवस यामिनी लोटुनियां काढुं किती अश्रुंचे मणी मायेविण नाहिं रडत कोणिही कुणा आतुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! येशिल त भेटण्यास अजुनि वाटतें घेउनियां ध्यास तुझा काळ कंठितें हरिणी मी दीन भ्रमुनि भटकतें वनां आतुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! येइं येइं भेट देई हृदय-रंजना पुष्पलता सुकुनि जाय जीवनाविना ! वरकांती प्रीति सोड, विरह साहिना भातुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! प्रकाशन - विविधज्ञानविस्तार; ज्ञानप्रकाश -४७- -