पान:आकाशगंगा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विरह गीत चाल -- महाराष्ट्र-गीत बघुं नकोस अंत अती धांव मोहना आतुर मी होहूं तुझ्या प्रेम-दर्शना ॥ ध्रु० ॥ दृष्ट-भेट प्रथम येइ घडुनि जेधवां साधिलास ढाव पुरा झुलवुनी जिवा वचनबद्ध करुनि, देशि तूं इमान ना ? आतुर मी होई तुझ्या प्रेम दर्शना ! ज्योतीला ज्योत जडुनि जीव रंगला सहवासें स्वर्ग तुझ्या तुच्छ भासला चातक मी मेघ तूंच गमत जीवना आतुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! भरलें तव रूप सख्या | हृदयमंदिरीं नाहिं तुझ्यावीण जिवा सुचत क्षणभरी प्रीतीची होय तुझी मजसि झडपणा आतुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! लावुनियां गोड आस मृगजलापरी भुलविलेंस सांग कुठें जाउनी दुरी ? जादुगार जादु करुनि दिसशि ना पुन्हां आतुर मी होई तुझ्या प्रेम-दर्शना ! -४६-