पान:आकाशगंगा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाय घसरला म्हणून - ( भूमिका - कविरत्न श्री. घालवेडे, आयुर्वेदविशारद् ) - काव्य-गायन करण्यास परिषदेंत कवी कोणी जाहला निमंत्रीत ! गळा सुस्वर नव्हताच जरी त्याला नांव होण्या तो इपापून गेला! निघायाची तो चालवी तयारी नटायाची त्याजला हौस भारी ! स्वरूप सुंदर लाभे न मुळीं कांहीं म्हणुनि देवा तो दोष मनीं देई ! कृष्णवदनाचा रंग झांकण्याला तयें लावियला दिखाऊ 'मसाला ' ! कैंस उलटे फिरवून भांग काढी साफ त्यांतुनि घोटली आज दाढी ! परिटघडिचा पोषाख जरीकांठी सजे घालुनि शाहीर तो मज्हाठी बूट पाय चढवोनियां नवीन विडी फुंकित तो निधे घरांतून ! घराबाहिर पाऊल ठेविलें न तोच मार्गी माजीर ये दिसून ! चिडुनि त्याला तो कांहिं मारणार घडुनि आला परि एक चमत्कार ! वृत्त—दिंडी -