पान:आकाशगंगा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्मृति - गीत आठवतो तुज कविते ! का तो काळ फजीतीचा ? बाळपणाचा, अज्ञानाचा, 'नक्कल' करण्याचा ! कान्यांगाचें ज्ञान चोरटें, चोरटाच जीव कळले नव्हतें काग्प काय तें ? स्फूर्ती निर्जीव ! छापित नव्हते संपादक कुणि, कविता बालांच्या 'कचरा' म्हणुनी टाकित होते भक्ष्यों कालाच्या ! उंसति परोपरि कोमल हृदया त्यांतुनही टीका गेले ते दिन ! कविते ! यापरि दउनियां ठपका ! बाळपणींच्या कविता सगळ्या स्फुरति आज फिरुनी मासिकपत्रांमधें तयांची गर्दी छापूनी ! तूं कविता ती, तोच कवी मी, निंदकही तेच परि होणारी टीका आतां डंसते ना खास ! कशास आतां असे निराशा ? झालें तें गेलें 'बनला ' कवि तो दाद न देई कुणी जरी भुकछे ! प्रकाशन-विविधवृत ● जाति- चंद्रकांत - - ४३ - --