पान:आकाशगंगा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भयाण काळोख्या अपरात्रीं स्मशानस्थानीं भीती भारी अशा प्रसंगी सहाय्यकारी धांवुनि येतो-शूद्र नव्हे हा देवाचा अवतार ! कमेटिचा नसतांना पास स्मशान-नाट्यगृहांत खास जाउं न कसल्या दे प्रेतांस पांच वयांतिल मृत पोरांही करील तो प्रतिकार ! पासांसोबत त्यांस दक्षिणा द्यावी लागे प्रत्येकांना मान तयाचा राखियला ना पुरा न होतो प्रेताचा त्या दहनविधीसंस्कार ! घरबसल्या हा प्रतिदिवसाला करी कमाई ताळ न तिजला लाजवील तो तुम्हां अम्हांला कनिष्ठ धंदा असुनि तयांवर लक्ष्मी हो दिल्दार ! जगांत ह्याची ख्याती मोठी कथा पुराणांतिल ना खोटी द्याचेपाशीं नोकरिसाठीं हरिश्चंद्र तो राजा राही होउनियां लाचार ! डोंबाची जरि महती गातो हेवा त्याचा मला वाटतो अंतर्यामीं मी तडफडतों मला नोकरी देइल हा का ?-जगतीं मी बेकार !! प्रकाशन - विहार - ३८- -