पान:आकाशगंगा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्मशानांतील डोंब हा डोंब खरा सरदार ! ॥ ध्रु० ॥ स्मशानभूमीवरी तयाच ताबा चाले पिढीजादचा सुखवस्तू हा तेथिल राजा प्रशांत, भीषण स्थानीं त्याचे सुंदरसें घरदार ! दिवस असो वा रात्र असो ती क्षणभर ह्यातें ना विश्रांती निमग्न काम-पोटासाठीं स्वार्थासंगें परमार्थहि तो साधी अपरंपार ! बेडरलेली त्याची वृत्ती मनास शिवते कधीं न भीती दगडाहुनि ती कठीण छाती भुतें खेंचरें जरी सभोतीं त्यांची ना दरकार ! प्रेतें येती दहनविधीला -३७- जाति कोकिळा स्वागत त्यांचें करावयाला देवानें हा दूत धाडिला मनांत त्याच्या-'रंक राव हा '-कधों न हीन विचार ! - -