पान:आकाशगंगा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेव्हां आणि आत बाले ! आपण खेळलों उभयतां वाल्यामधें जेधवां सत्यप्रेम तुझे अलोट बघुनी आनंद झाला जिवा ! माझ्यावांचुनि ना तुला करमलें दारीं घरीं वा कुठें तूझ्या सन्निध राहुनी धरियर्ले मी ना कधीं वांकडें ! उद्यानों फिरकों प्रभातसमयीं नाना फुलें वेंचत गेलों घालुनियां करांत करही त्या पाठशालेप्रत ! दोघां पाहुनि एकमेक, अपुले आप्तेष्टही तोषले आशीर्वाद तयांकडून शुभ ते कित्येकदां लाभले ! बाल्याचा रमणीय काल सरुनी येई अतां यौवन दोघांच्या चरितांतुनी कसकश स्थित्यंतरें होउन ? नाहीं भेट तुझी-तशी मम तुला पूर्वीपरी जाहली शेजारीं नित राहुनी वद कुणा ही रीत गे शोभली ? दृष्टादृष्ट कधीं चुकून घडतां तूं कां बरें लाजशी ? गालीं हांसत मात्र तूं खुणवुनी भाषा मुकी बोकशी । त्याचा अर्थ जरी मुखांतुनि तुझ्या ना स्पष्ट संभावका केन्हांपासुनि अंतरांत बघ मी हेरून तो ठेविला !! प्रकाशन- सत्यवादी वृत्त - शार्दूलविक्रीडित - -३९-