पान:आकाशगंगा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपदा लयाला गेली आपदा छळाया ठेली होणार चुके नच केव्हां जे लिहिले प्राक्तनांत | एकदां दिल्या वचनांसी त्यजुनी तूं जाशी मजसी कां रीत उलट प्रीतीची वांवरते ह्या जगांत ? कां करिशी हृदय कठोर ? लावुनी जिवा मम घोर जाहल्या कळ्या आशेच्या विरहानें भस्मसात ! झुरझुरुनी माझा प्राण तुजसाठीं हो हैराण ही रात्र तुझ्याविण चंद्रा ! बघ झाली रे अनाथ ! जरि कलंक चंद्रा आहे चंद्रिका सदा तो साहे जी जड़े एकदां प्रीती ना तिजला घातपात ! तूं येशि न जरि भेटाया 6 ' सुखरूप ' तुला ऐकाया सारखा ' ध्यास ' हा लागे उरलेल्या जीवनांत ! प्रकाशन – विविधज्ञानविस्तार; ज्ञानप्रकाश - - ३६- - -