पान:आकाशगंगा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ध्यास तव पायीं जिव हा वेडा बघ होई प्राणनाथ ! ॥ ध्रु० ॥ भटकतां कुठे एकांत भुलशी मम देखनि कांती चाल - आशिर्वाद - मोहिलें नजर भिडवोनी तूं मजला त्या क्षणांत ! प्रीतीची पहिली दृष्टी उभविते जादुची सृष्टी निमिषांत करोनी टाकी मम हृदया आत्मसात ! जीव शीव व्हाया एक प्रीतीचे मार्ग अनेक उभयतां वरुनि स्वच्छंदें सांपडलों बंधनांत ! संसार जुटीचा गोल चालविला कांटेतोड़ आनंद स्वर्गिचा देई त्यामधुनी गोड साथ ! साम्राज्य वैभवा चढले परि काळा नच आवडलें तो भोग पूर्वकर्माचा विष टाकी अमृतांत ! नैराश्यकडा कोसळला ह्या अभागिनीवर पडला लागोनि तुला गुणवंता ! एकाकीं दुष्ट नाद ! -३५-