पान:आकाशगंगा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेढ्यांचा असला जियें भरुनियां बाजार गेला असे मी आतां करुं काय स्वस्थ बसुनी ? हो चित्त वेडेपिसें ! त्यांनी त्यांत ' विडी' तशी 'चिलिम' ना फुंकावया ठेविली काढूं साधन कोणतें हुडकुनी ?- मस्स्फूर्ति चेकाळली ! वृत्ती गाजरपारखी करुनियां त्यांच्यामधं नंतर जादूच्या पिशवींतुनी नविन मी हे काढितो 'गाजर ' ! पुंगी' वाजवितों अतां बनवुनी त्याचीच काव्यांतुन नाहीं ती जर वाजली तडक मी खाऊनियां टाकिन !! 6 ↑ एका प्रसिद्ध कवीच्या लौकरच (?) प्रसिद्ध होणाऱ्या 'गाजराची पुंगी' ह्या कवितासंग्रहाचा माझ्या कवितेशीं अर्थाअर्थी कसला काडीचाही संबंध नाहीं हें आधींच येथें सांगून ठेवलेलें बरें! नाहीं तर एखादा पुणेरी 'सत्यवादी' (!) मलाही बाताराम' म्हणायचा !! " प्रकाशन – विविधवृत्त - ( खास अंक ) - ३४-