पान:आकाशगंगा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

+ गाजराची पुंगी AU चाले गोंधळ नित्य काय कसला श्रीशारदामंदिरीं जावें जेविं तदा तिथें झडतसे आवाज कांहीं तरी ! फुंकी 'शिंग' कुणी सुरू न अगदी झाली 'तुतारी' कुठे देई थाप 'डफावरी' बडविलें कोणीं न जो 'चौघडे '! शाहीरी सरतां सुरेल ' मुरली' कोणी तरी वाजवी 'पांवा ' ऐकुनि 'बांसरी-सनइ 'ला हाताळताती कवी ! ' सारंगी 'स्तव भांडतो 'तुणतुणे' घेऊनि तो 'गोंधळी' कोणी शाहिर 'बँडवादन' करी काढून वृत्ते खुळीं ! - वृत्त - शार्दूलविक्रीडित ● - पोराचा कुणि वाजवीत बसतो ' घुंघूरवाळा' कुठें त्याचे पाहुनि तें- कुणी ' खुळखुळा ' घेतोच हातामधें ! काढी — बोल पिपाणि'चे रडुनियां काव्यांत कोणी तरी त्याला साथ करावयास दुसरा हातीं 'नगारा' धरी ! कोणी घालित 'शीळ ' ती फिरतसे काव्यांत वेडयापरी बाधा भूतमयी जडून 'कवडा 'त्या' गर्जना ' नांवरी ! जो जो तो उठतो ' विलाप' करितो- मेलें न कुने जरी 'बोंबाबोंब' तशी-जरी न शिमगा काव्यांत कोणी करी ! 6 -३३- -