पान:आकाशगंगा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जरी साठी उलटून पार जाई तरि न त्याचे मानून मुळीं कांहीं झोंक तरुणाचा काय म्हणुनि दावी सांग मजला हे कोण तरी आई ? घरिं न कोणी स्वैपाक करायाला त्रास म्हणुनी देण्यास आपणांला अगांतुक हा पाहुणा काय येई ? सांग मजला हे कोण तरी आई ? झोंप जेव्हां लागे न ती अम्हांला म्हणत होतिस ना-'पहा बुवा आला ! तुझ्या हांके कां दैत्य तोच येई सांग मजला हे कोण तरी आई ? शब्द ऐसे ऐकून बालिकेचे दीन मातेला बोलवे न वाचे ! जवळ ओढुनि तिज कळावेलें खुणेनें- " "तुला येती वरण्यास हे खुषीनें !" प्रकाशन - मुलांचें मासिक - -२८- -