पान:आकाशगंगा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोण हे आई ? वृत्त - दिंडी श्री. आनंदराव टेकाडे यांची 'कोण हें आई' ही कविता ज्यांनी वाचली असेल. श्यांना या कवितेंतील रहस्य अधिक कळून येईल. कण्हत कुंथत किति मंद चालतात मुखावाटे झणि॑ि शब्द मात मान बगळी लुकलुके सर्वदाही सांग मजला हे कोण तरी आई ? सदा वदनीं औदास्य पसरलेलें सोंग रोग्याचे काय हेंच आलें ? रडे केव्हां वा विव्हळे कधींही सांग मजला हे कोण तरी आई ? केंस डोक्याचे शुभ्र एकजात तोंड तैसे बोळके नसुनि दांत पडुनि खांचा डोळ्यांस दिसत नाहीं सांग मजला हे कोण तरी आई ? पान पिकलेलें खरोखरी भासे कळत नाहीं काधं गळुनि पढायाचें बघुनि जो तो हांसून झांस घेई सांग मजला हे कोण तरी आई ? - २७- -