पान:आकाशगंगा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुंफलेली माळ हृदयिंचा हरपला लाल जरी १ ही माळ कुणाला घालुं तरी ? ॥ ध्रु० ॥ वसंतसमयीं बाग फुलांची परसांमधली फुलली माझी फुलें तयांतिल तोडुनि ताजीं गुंफिली माळ मीं चुकुन खरी । अल्लड असतांना मी बाला विवाह मंगल जो नच झाला वैधण्याचा तों ये घाला स्थिति करुणास्पद माझी सारी ! कपाळ माझे हे फुटलेले सौख्य न मजला देई कसलें वेडें मन प्रेमास भुकेले जगरूढि परंतू घात करी ! निष्ठुर काळाचा हा कावा सासुरवास विटलें जीवा बोल किती तुज लावूं दैवा ? निशिदिनीं झुरत मी लाचारी ! पुष्पमाळ ही गुंफियलेली सुकुनी होइल जगावेगळी हाय ! परंतू तिज ना वाली झोंपला प्रभू का गिरिधारी ? प्रकाशन – संजीवनी - जाति- प्रणयप्रभा - -