पान:आकाशगंगा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृत्त - भुजंगप्रयात (स्थळ - जोगेश्वरीनाका भूमिका-बकंभट उपाध्ये ) -- भिक्षुकांस निमंत्रण . चला भिक्षुकांनो ! अतां ह्या घडीला उपाध्ये पहा बोलवीती तुम्हांला चला शांतवायास ती पोट-खाई तिथं दाखवा थाट तो पेशवाई | चला घेउनी सर्व चंबू-गवाळे नका सोडुं वा बायका आणि बाळे सदा अक्षदा द्या स्वतःच्या घरांस असे फर्मवती उपाध्ये तुम्हांस म्हणा कांहिंही मंत्र तोंडांमधून कुळांला परी खूष ठेवा वरून ! परब्रह्म तें अन्न खाऊन खास मुखे देत जा कर्पंटी ढेकरांस ! पुरे वल्गना ! पाय जोरांत हाणा तुम्हां आज जाणे अती लांब जाणा ! नका उन्ह मानूं- चला सर्व थेट तुम्हांवीण जत्रेमधे शुक्शुकाट ! कसा आपुल्या कंबरा, - वेळ झाला चला सोवळे घ्या पळी आणि पेका ! कुणी दर्भ, पोथी कुणी पंचगव्य - २४. -