पान:आकाशगंगा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निंदकांस - - कशीही चालुं दे टोका अतां रे निंदका ! तूझी अजूनी काव्य-रचनेची न पूर्वी जाहली माझी ! लिहाया बैसलों जेव्हां मराठी काव्यसंभार मनी ती कल्पना नव्हती तुझा लाभेल शेजार ! परी ह्या काव्यप्रारंभी तुझी ती झोड टीकेची बघूनी अंतरी माझ्या सुखानें उसळती वीची ! जरी मी होई एकांगो; तुझ्यावांचूनियां साचें करावें काव्य मीं कैसे ? करोनी चीज ना त्याचें ! कळाया सर्व लोकांना कवीचें काव्य तें गोड अशा ह्या योग्य संधीला तुझे शस्त्रास्त्र बिन्तोड ! मिळाली जोड जर मजसी तुझ्या त्या तीक्ष्ण टीकेची पुरे ती खास ईयेनें कराया पूर्ति काव्याची ! वृत्त - वसन्त तुझी ती चंद्रिका टीका जरी राहील ना फुलती जगीं मत्काव्य-सिंधूला कशी यावी बरें भरती ? प्रकाशन – सत्यवादी - -