पान:आकाशगंगा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बठलेल्या वृक्षास- ऐशी हीन दशा तुझी दिसत कां वृक्षा! हिवाळ्यामधें ? तेजाचा लवलेशही न झळके तूझ्या शरीरी कुठें ! पानें, मोहर, पालवी नव, फळें जो शोभणारीं तुला गलीं ह्या समयीं झडून म्हणुनी कां खिन्न तूं जाहला ? आनंदप्रिय तो तुझा समय रे ! कोठें वसंतांतिल ? पक्षी मित्र तुझ्यावरी विहरले स्वच्छंद रात्रंदिन ! आतां तूं दिसतोस रुक्ष म्हणुनी पाही तुला ना कुणी येतां संकट तें सहाय्य करण्या कोणी न ये धांवुनी !

बोलूं मीच तुला कशास्तव बरें ? मद्भाग्य हे संप्रती- आहे स्वरलम; जाळितो मम जिवा हा काळ दैन्यांमधीं ! "जों आहेत शितें-भुतें तंबवरी" न्यायानुसारें अतां कोठें मित्र मला जगांत उरला ? द्याया मना शांतता ! काळाची करणी कठोर जगतीं ना दोष माझा तुझा जी दे देव स्थिती तयांतुनि सदा आनंद मानायचा ! नाहीं कृष्ण ढगाविना नभ, तसे दुःखाविना जीवित दुःखाच्या तिमिरी कधींतरि शशी येईल तो हांसत. प्रकाशन - ज्ञानप्रकाश - - शार्दूलविक्रीडित - - १२- - -