पान:आकाशगंगा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किल्ल्यावरून कोसळलेल्या खडकांस- गांवापासुनि दूरदूर वसलें जें स्थान शांतिप्रद त्या ठायीं खडका! निवास तव हा होई कसा संतत ? दैवाच्या फिरत्या गतींतुनि तुझें आयुष्य जें चालले सन्मार्गास्तव तें मला गमत कीं देवाकडे गुंतलें । सानिध्यास तुझ्या चिरंतन दिसे देऊळ सम्मंगल झाडें ज्याभ॑वती फुले उधळती वायूसवें मंजुळ तूंही निश्चल तापसासम इथें होतां समाधिष्टित येई देवकळा अपाप तुजला लागून सत्संगत ! 'केलें कार्य जसें-तसें फल मिळे' जो दाविशी प्रत्यय वृत्त - शार्दूलविक्रीडित - - ती ये कामगिरी तुझी स्मरुनियां- नाहीं कधीं ज्यां लय ! येथूनी दिसतो 'अजिंक्य' म्हणुनी तूं त्याच किल्यावर होता भव्य कडा धरून तिथल्या ईशान्य बुर्जावर ! स्या काळीं जरिचें निशाण भगवें किल्ल्यावरी शोभलें काळाला रुचलें न तें उलट तैं अन्यांस कीं योजिलें ! येई मोंगल-भूप चाल करुनी दक्षीण देशांतुन हल्ला तो चढवी अचानक तौ किल्ल्यास ह्या वेढुन | गेले लोटुनि तीन चार महिने चालू लढाई जरी किल्ला होइ न मोंगलांस वश तो, कांहींहि केलें तरी ! क्रांती हाय खरी सुरुंग उडतां ईशान्य बुर्जावर तूं घेशी खडका ! धडाडुनि उडी धांवून शत्रूंवर ! होता निर्जिव तूं तरी निजबळें 'स्वातंत्र्य' राखावया केली मर्दुमकी रणांत पडुनी शत्रूंस महूनियां ! ( दैवानें यवनांस ये यश जरी - ) तूं चित्र जें काढिलें चैतन्यास्तव तें निरंतर हृदीं कोरून मी ठेविलें !! (सातारा) प्रकाशन – काव्यरत्नावली - - १०- -