पान:आकाशगंगा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सावकारी ( कवि – यशवन्त ! – असूं द्या माफि, करा दिलसाफि ) - - वृत्त - वारुणी - येइं भाई येथ पाहीं थाटली ही सावकारी धर्म-जाती येथ कांहीं भेद ऐसा ना विकारी ! दैन्यतेचा हा कढाखा दुर्दशा होई जिवाची ह्या जगीं पैसाच त्राता त्याविना प्राणी भिकारी ! खर्चराशी जीवनीं बोकाळुनी त्या गांजताती तुंबते बाकी सदा अन् होइ देणें दारिंदारीं ! तोंड ना ये दाखवाया भंडवीतो दंडधारी दीन बंधो ! मांडिली ही तूझियासाठी उधारी ! खानदानी शेठ कोणी वंशजी त्यांच्याच पेढ्या थाटल्या काढून सोयी सवलतीच्या बेसुमारी ! नाडल्या जीवांस येथें द्यावयातें कर्जपाणी मारवाडी मात्र माझे व्याज; ही माझी खुमारी ! थोडिशी वा फारही घे कर्जसंख्या लागणारी मुक्त कर्जातून हो त्या ! येउं दे अंगीं हुषारी ! फेडतां सव्याज देणे होउनी नादार अंत जो दगा देशील दुष्टा ! तेवढी हानी हमारी ! प्रकाशन - विहार -