पान:आकाशगंगा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती गरीबी स्थिती त्यांतुनीही निभावून नेलेस ते दुर्दिन पतीच्या सर्वे गोड संसार केला यशःश्री घरा तूंच गे आणुन ! वैधव्य आले कपाळीं तरी तूं प्रंसगांस त्या तोंडही देउनी हत्सागरी दुःख तें सांठवीलें- तुझ्या मुग्ध बाळांकडे पाहुनी ! - घणाचे जगीं घाव तं सोसल्यानें खरें देवतारूप लाभे तुला तुझ्यावीण नाहीं मला देव कोणी, तुझ्या थोरवीला जगीं ना तुला 1 तुझ प्रेम निर्व्याज, आनंददायी तयाचे पुढें व्यर्थ सारें जग तुझ्यावीण माया खरी ना कुणांला, नसे अन्य वा कोणि संरक्षक ! अमर्याद आभार भाई ! तुझे ते कळेना तुझ्या बालकांला जरी खात्री पुरी होय ! ना फेड त्यांची कधीं व्हायची जन्मजन्मांतरी जिवालागि अत्यंत कांट्यापरी है सदा टोंचतें शल्य रात्रंदिन तुझी होइना अल्पही योग्य सेवा जरी व्यर्थ जाती क्षणानुक्षण ! क्षमेची सदा याचना मीं करावी-क्षमा तूं किती दाखवावी पण ? आई! मला देई आशीर्वचाला, करी वरस हा गे तुला वंदन ! सामर्थ्य येवो शरीरांत माझ्या तुझे फेडण्या पांग थोडे तरी आयुष्य लाभो तुला दीर्घ आई ! -टिकाया कृपाछत्र माझ्यावरी. प्रकाशन - विविधज्ञानविस्तार; काव्यरत्नावली; ज्ञानप्रकाश - -२-