पान:आकाशगंगा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आई वृत्त - सुमंदारमाला आई ! मला जन्म देऊनियां तूं जगाच्यापुढे आणिलें जेधवां केलं खरें पुण्य मी पूर्वजन्मीं असे वाटते खास माझ्या जिवा ! माझ्याचसाठी किती यातना गे ! तुला लागल्या भोगण्याला बरें ? मना कल्पना येत नाहीं तरीही - फुलाहूनि संरक्षिलें आदरें ! बाल्यामधें अंतरीचा जिव्हाळा तुझा लागुनी हांसलों, खेळलो केले घराला पुरेपूर तेव्हां झणीं प्रीतिला पात्र मी जाहलों ! अविश्रांत खोडया अहोरात्र केल्या दिला त्रास सर्वास अत्यंत मीं पोटामधें दोष घालून सारे न केलेंस कौतूक केव्हां कमी फिरे घार आकाशमार्गी तथापी तिचें चित्त सारें पिलांच्यावर घरांतील कामांमधे दंग तूंही तरी ठेविलें लक्ष माझ्यावर ! तेजोनिधी दिव्य देवांगना तूं सुधा आणुनी चंद्रलोकांतली जणूं ज्ञानसंवर्धनाच्या मिषानें मला दुग्धपानापरी पाजली ! निर्दोष वात्सल्यभावामुळे त्वहृदींचा करूनी मला पाळणा वारा न लागू दिला अल्पसाही कशी सांग केलीस जोपासना ? तुझी जागती ज्योत माझ्यासभाँती; पवाडे जुन्या काळचे गाउनी कुलाचे मला नांव राखावया खास संचारशी शक्ति-सौदामिनी ! निद्रिस्त मी; दाखवीशी मला तूं खरा शिस्तिचा मार्ग मोक्षप्रद होई तुझ्या शिक्षणानेंच माझे सदा ज्ञानभांडार वृद्धिंगत ! क्षमा, शांततेचे, मनोधैर्यतेचे- तसे स्वाभिमानी धडे देउनी विस्तारण्या भावना अर्पिशी तूं मनोमोहिनी स्फूर्ति-मंदाकिनी ! - १-