पान:आकाशगंगा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारका सुरम्य किति तारका चमकती नभःप्रांगणी जणूं उधळलीं फुलें घघल जाइचीं तीं कुणीं । प्रशांत समयास वा फुटुनि स्वर्गभांडार ते जवाहिर तयांतुनी गळुनि काय सारें पडे ! सुनील गगनोदरी उदय पावता चंद्रमा तयास करि माळ का रजनिदेवता ती रमा ! फुले खुडुनियां तिनें उपवनांतुनी कोठल्या प्रफुल्ल कुसुमासवें कितिकही कळ्या गुंफिल्या ! सुहास्य उधळोनियां विलसतात ज्या तारका जणूं गमत शालिनी नविन त्या वधू-वलिका ! सुखें विहरतात की प्रणय-बालिका थिल्लर सुधांशुनृपभोंवतीं विनत की स्त्रिया-किंकर ! समग्र गगनांगणी पसरला रुपेरी चुरा कुणी ? - कळत ना कुठें फुटतही पयाचा झरा ! गुणी सकल अप्सरा जमुनि का नभोमंदिरों सुरेख नव गालिचा सुखद काढिला भर्जरी ! भयाण पसरी तमःपटल रात्र सृष्टीवरी म्हणून सुखवावया जळत दीप हे का तरी ? जसे हरितशा तृणांतुनि चकाकती काजवे नभांतुनि निळ्या तसे हंसति तारकांचे थवे ! - ९०- - वृत्त - पृथ्वी