पान:आकाशगंगा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कविता-गायन मम कवन कुणा हैं गाऊं रसिकांविना ? क्षण कुणी जरी, श्रवुनि घे तरी प्रसन्नता ये मना ! ॥ ध्रु० ॥ जाति - बालमुकुन्द - मज कवी न कोणी म्हणती कांहीं खरा वा शाहिर नसुनी गोंधळ करितो पुरा की बेसुर कोणी म्हणती गातो जरा ह्या अपशब्दांनी घडति जिवा यातना | करि 'गिल्ला " कोणी पडावया मी फशीं क्षणभरांत त्यांची मर्जी जाते कशी ? अन् त्यांत कोठुनी मिळतां 'अंडीं-भजीं करि जखमेवरती प्रताप अपुला चुना ! गंधर्व-कवींचें गान तुम्ही ऐकतां वा श्वान भुंकतां मुकाटही सोसतां । मग तुम्हीच माझं ऐका गाणे अतां हो दगड- देव तो '- तुमच्यावांचुनि कुणा ? - (१) साहित्यसंमेलनांत अगर कॉलेजांतून कवितागायनाच्या प्रसंगी नवख्या कर्वीवर जो गिल्ला ( Attack ) करण्यांत येतो तो कुणास ठाऊक नाहीं ? ( २ ) ' गंधर्व' हे कोणी कवि नसून चांगल्यापैकी काव्यगायक आहेत असे कवि. प्रकाशन - विविधवृत्त - -८९- -