पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "त्यानं तुला आयुष्यभर दुःख दिल्यावर आता तरी त्याचं ऋण फिटलं असं समजायला हरकत नाही."
 "त्यानं मला आयुष्यभर दुःख दिलं असं नाही म्हणू शकत मी."
 "फ्रेनीनं दिलं म्हण. पण त्यानं ते नुसतं अलिप्तपणे पाहिलं ना?"
 "तो त्याबद्दल काही करू शकत नव्हता."
 "त्याला काही करायची इच्छा नव्हती असं म्हण."
 "तसं नाही मी म्हणू शकत. त्याला फ्रेनीबद्दल अशी काही जबाबदारी वाटत होती की, तो तिला दुखवू शकला नाही."
 "तुला दुखवायला मात्र तो मोकळा होता ?"
 "उजू, आयुष्य असं काळं-पांढरं नसतं. काही तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागतात. बरं, अगदी व्यावहारिक पातळीवर येऊन विचार केला, तरी रुस्तुमला सोडून देऊन मी काय करणार होते ? ह्या समाजात मी माझं स्वतंत्र स्थान निर्माण करू शकले नसते. तेव्हा रुस्तुमला चिकटून रहाण्यात माझा स्वार्थही होताच."
 ह्यानंतर ॲलिस परत रायरेश्वरला जाऊन राहिली ती काही वर्षांनंतर एकदम भेटली. तिच्या स्तनात एक गाठ आली होती. तो कॅन्सर ठरला आणि तिचं ऑपरेशन झालं. सुदैवानं रेडिएशन थेरपीचा तात्पुरता तरी उपयोग होऊन ती चांगली बरी झाली. मग एकदा तिनं मला सहकुटुंब रायरेश्वरला राहून जा म्हणून बोलावल होतं. निरोपाचं म्हणून की काय असं मला वाटून गेलं. पण ती मजेत दिसली. आपण फार दिवस जगणार नाही हे तिला कळलेलं असलं पाहिजे, पण त्यामुळे तिच्यात काही बदल झाला नव्हता. रायरेश्वरचं तिचं आयुष्य नेहमीसारखंच चाललं होतं. भटकाभटकी, बागेच्या कामावर देखरेख, बाजार करणं सगळं नेहमीइतकंच मनापासून. तिच्या बोलण्या-वागण्यावर खिन्नतेचं, कारुण्याचं सावट सुद्धा भासल नाही. नेविल शूटची एक कादंबरी मी वाचली होती. त्यात एका गावातले सगळे लोक, आपल्या दिनक्रमात जराही बदल न करता,

३२ - ॲलिस