पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्तुळात तिच्या देशात तिला कुणी थारा दिला नसता. पण इथे ती कशी का असेना इंग्लिश मड्डम म्हटली म्हणजे जणू आकाशातनं अवतरली असं वाटतं लोकांना.
 ती केवळ संधीसाधू होती हे रुस्तुमला कधी कळलंच नाही शेवटपर्यंत की, त्याला ते कळलं होतं पण तिच्यावरच्या निष्ठेमुळे म्हणा किंवा आपले तिच्याबद्दलचे आडाखे चुकले हे कबूल करण्यात कमीपणा वाटल्यामुळे म्हणा, तो तिच्याबद्दल काही वाईट बोलायचा नाही. ती मात्र त्याच्याबद्दल असलं काही पथ्य पाळीत नसे. कुठेही काहीही बोलायची. तो एक कवी, चित्रकार आहे ह्याचं तिला काहीच कौतुक नव्हतं. तू काहीतरी काम कर, नोकरी कर असा ती सारखा त्याच्यामागे लकडा लावायची. नोकरीच्या धकाधकीत त्याची कला गुदमरून जाईल ह्याचं तिला काही सुतक नव्हतं.
 "ते तरी काम तो कुठं करतो ?" असं ती म्हणायची. "अधनंमधनं कॅन्व्हसवर चार ब्रश मारायचे ह्यानं काही कलाकार होत नाही. त्याचं एक तरी एक्झिबिशन झालंय का ?"
 मी म्हटलं, "प्रसिद्ध होणं म्हणजेच उत्तम कलाकार असणं असं आहे का ? कितीतरी चित्रकारांना त्यांच्या सबंध आयुष्यात प्रसिद्धी लाभली नाही. ते मेल्यावर कित्येक वर्षांनी लोकांना त्यांच्या कलेची किंमत कळली."
 "पण ती कळण्यासाठी त्यांच्यामागे त्यांनी काढलेली चित्रं तर ! होती ना?"
 इतका दुष्टपणा ! पण मी गप्प बसले. माझा भाऊ स्वतःच्या समर्थनाचा एक शब्दही काढीत नाही तोवर मी त्याच्या वतीने भांडून तरी काय होणार ? एकदा मी त्याला असं म्हटलं तर तो म्हणाला, "अगं तू कशाला तिचं बोलणं मनाला लावून घेतेस ? ती नुसती मस्करी करीत असते." ही कसली जीवघेणी मस्करी ?
 पुढे त्याचं पहिलं एक्झिबिशन झालं तेव्हा मात्र ती तिथे

फ्रेनी -७