पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे होती, कारण रुस्तुम जरी गरीब नव्हता तरी तिच्यावर वाटेल तसे पैसे उधळण्याइतका श्रीमंतही नव्हता. तरी सुद्धा ती त्याच्या मागे लागली होती तेव्हा ह्यात काहीतरी काळंबेरं आहे असं मला कळायला हवं होतं. जेव्हा उमजलं तेव्हा सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. ती त्याला जळूसारखी चिकटली ती कायमचीच.
 अजून कधी कधी मला वाटतं की, त्याच्या रागाची पर्वा न करता मी त्याला जागं करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पण मला हेही माहीत आहे की त्यावेळी त्याला जागं व्हायचंच नव्हतं. तिच्यात काहीच वैगुण्य पहायला तो तयार नव्हता. ती किती सुंदर आहे ह्याचं सुद्धा तो तोंड भरून कौतुक करायचा. एकदा मी म्हटलं, "त्यात मूळ सौंदर्य किती आणि प्रसाधनांची किमया किती कोण जाणे." तर तो म्हणाला, "पण प्रसाधनांचावापर करून जास्तीत जास्त सुंदर कसं दिसायचं हे तरी तिला कळतं ना ? मला अशा कित्ती बायका माहीतायत की मारे रंगरंगोटी करून सुद्धा भीषण दिसतात." हा रुस्तुम एकेकाळी नटूनथटून तोंडाला रंग फासून आहोत त्यापेक्षा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बायकांबद्दल तुच्छता दाखवायचा !
 ती किती उदार आहे हेही तो बोलून दाखवायचा. एकदा आमची जरा अडचण असताना तिनं आपले चार दागिने मोडून पैसे उभे केले होते. दागिने तरी कुठले, तर मित्रांकडून उकळलेले.आणि शेवटी ती ह्या कुटुंबातलीच एक होती ना ? मग जे केलंन त्यात एवढं मोठं औदार्य कसलं ? आम्ही नाही आमच्याकडे होतं नव्हतं ते सगळं दिलं?
 ॲलिस काय होती न कुठे येऊन पोचली ! अन् हे सगळं आमच्या नावावर. नाहीतर कोण कुत्रं तिला विचारीत होतं ? तिच्यात असं काय होतं की, तिला इथल्या समाजात लाभलं ते स्थान लाभावं ? फक्त गोरा रंग. पण ह्या देशात तेवढंच बास आहे हे तिनं चटकन हेरलं होतं. इथं ती ज्या वर्तुळात वावरली तशा तऱ्हेच्या

६ - ॲलिस