पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९२]
भाग नववा.


मागे त्यांच्या वंशजास योग्य असा पराक्रम गाजवून स्वराज्याची व श्रीमंत पेशवे सरकार यांच्या लौकिकाची. बढती केली. तुकोजीरावाची कारकीर्द एकंदर तीस वर्षांची झाली. तितक्या अवधीत त्याने अनेक लढाया जिंकल्या, पुष्कळ राजकारस्थाने केली, पण ती येथे सांगण्याचे आम्हांस कांही प्रयोजन दिसत नाहीं; फक्त अहल्याबाईशी त्याने आपले वर्तन कसे ठेविले होते व त्यामुळे होळकराच्या कुटुंबास सुख आणि भूषण ही दोन्ही कशी प्राप्त झाली हे निवेदन केलें म्हणजे बस्स झाले व एवढ्यावरूनच आमच्या चरित्रनायिकेच्या अंगी मनुष्याची पारख करण्याचा गुण किती चांगल्या प्रकारे वसत होता याविषयी वाचकांची खातरी होईल.

 अहल्याबाईने तुकोजीस गादीवर बसविल्या पासून होळकरांच्या राज्याचा अधिकार दोघांत वाटला गेला असें ह्मणण्यास हरकत नाही. इतिहासाकडे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले तर राज्यकारभार चालविण्याच्या संबंधाने साधारण असा नियम आढळून येतो की, ज्याठिकाणी गादीस दोन, अधिकारी झाले तेथील राज्यकारभार एक आठवडाभरदेखील सुरळीतपणे चालणे कठीण. पण आश्चर्याची गोष्ट ही की, अहल्याबाई आणि तुकोजी होळकर या उभयतांनी होळकरांचा राज्यकारभार एक सारखा तीस वर्षे सुयंत्रित रीतीने चालविला. दोघांमध्ये एकविचार आणि परस्परांविषयीं पूज्यबुद्धि या सद्गुणांचे पूर्ण वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या मनांत राज्यलोभ आणि मत्सर यांचा प्रवेश न होतां एकमकांच्या प्रेमांत कधी अंतर पडले नाही. तुकोजीराव वयाने मोठा व पूर्ण समंजस आहे असे जाणून होळकरांच्या गादीचा मालक