पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अहल्याबाई आणि तुकोजी होळकर.

[९३]


होण्यास व आपणास सुख आणि संतोष देण्यास अहल्याबाईनें त्यास निवडले होते व त्याप्रमाणेच त्या कृत्यांत तिला पूर्ण यश मिळाले. तुकोजीनेही आपणावर व आपल्या वंशजांवर उपकार करणाऱ्या या महासाध्वीविषयी आपल्या अंतःकरणांत निरंतर कृतज्ञता ठेवून तदनुरूप तिजशी आचरण ठेविले. लोकांच्या सांगण्यावरून अथवा स्वतंत्रतेची इच्छा धरूंन हा महाप्रतापी सरदार तिची आज्ञा भंग करण्यास कधी प्रवृत्त झाला नाही. त्या राजपत्नीच्या ठायीं त्याने केवळ मातेप्रमाणे भाव ठेविला असून तिच्या वचनांत राहण्याविषयीं तो सदा तत्पर असे, व व्यवहारांतही तो त्याच नात्याने तिला आई ह्मणत असे. तो अहल्याबाईपेक्षा थोडा वयाने अधिक होता, ह्मणून त्यास पुत्र ह्मणण्यास तिला संकोच वाटे, ह्मणून ती त्यास मल्हाररावांचा पुत्र मणवीत असे व आपल्या आज्ञेने मोहोरेवरही 'मल्हाररावांचा पुत्र तुकोजी' असेच तिने शव लिहविले आहेत.आपण ज्यास पसंत केलें तो आपल्याशी अशा निर्मलाचरणाने वागतो हे पाहून अहल्याबाईस फार आनंद होत असे, व त्याची कोणतीही इच्छा पूर्ण केल्यावांचून ती राहात नसे. साऱ्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत अहल्याबाईच्या विचाराविरुद्ध अशी एकच गोष्ट तुकोजीच्या हातून घडली होती व ती अगदी आरंभीची होती. ती खाली लिहल्या प्रमाणे-

 तुकोजीरावास श्रीमंताकडून वस्त्रे घेण्यास अहल्याबाईने पुण्यास पाठविले होते व त्याबरोबर शिवबा बानीव नारो गणेश असे आपले दोघे कारकून दिले होते. त्यांपैकी नारो गणेश यास त्याचे दिवाण नेमून शिवबा बाजीस श्रीमंतांनी आपल्याजवळ ठेवून घेतले असें