पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९०]
भाग आठवा.


जून दादासाहेबांची फजीती करण्याचा निश्चय केला. तिने आपल्या पदरच्या दोनशे दासींना हातांत भाले घेऊन लढाईला तयार राहाण्यास सांगितले व आपण स्वतःही त्याचप्रमाणे तयारी करून त्यांसह दादासाहेबांबरोबर सामना करण्यास मैदानांत येऊन उभी राहिली !

 इकडे हट्टास पेटलेले दादासाहेब आपली तेथे असलेली सर्व फौज बरोबर घेऊन मैदानांत आले आणि पाहतात तो तेथे सर्व स्त्रियांचीच पलटणअसून त्यांत पुरुष कोणीही नाही असे त्यांस आढळले. तेव्हां त्यांच्या फौजेतील लोक बायकांशी लढण्याची आमाला लाज वाटते असें ह्मणून माघारे जाऊ लागले. त्यांनी अहल्याबाईस असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले की, मी श्रीमंत पेशवे यांची आश्रित अशी एक स्त्री आहे तेव्हां अर्थात् माझा सर्व परिवार स्त्रियांचाच असावयाचा. आतां जर मला खुद्द यजमानाशींच लढाईला उभे रहावे लागणार तर याच त्यांनी दिलेल्या परिवारानिशी राहिले पाहिजे. तर तुह्मी आमचा पराभव करून मग वाटेल तर सारें द्रव्य घेऊन जा. त्याशिवायमात्र एक छत्रपति देखील तुह्मांस मिळणार नाही. आमच्या चरित्रनायिकेची ही समयोचित योजिलेली युक्ति पाहून दादासाहेब मनांत फार ओशाळले. आणि त्यांनी तिला सांगितले की, तुझ्या द्रव्याची तूं मालकीण आहेस. त्याचा तूं वाटेल तसा व्यय कर. आम्ही याउपर त्यावर कधी डोळा ठेवणार नाही. आम्हांस द्रव्य संपादन करण्याचे दुसरे पुष्कळ मार्ग आहेत.

भाग आठवा समाप्त.