पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८६]
भाग आठवा.


त्यांनी तुकोजीरावाकडे कारकून पाठवून त्यास विचारिले की, मालीराव वारल्यामुळे आह्मी दुखवटा घेऊन बाईच्या समाचारास आलों असतां आपण वांकडी गोष्ट सांगतां हे काय ? दादासाहेबांच्या या म्हणण्यावर तुकोजीने उत्तर पाठविले की, जर आपण आमच्या समाचारास येत आहां तर फौज आणण्याचे कारण काय ? आपण पालखीत बसून यावें. ही फौज, राज्य व दौलत आपणांवांचून दुसऱ्या कोणाची आहे ? तुकोजीरावाकडून असा जवाब येतांच त्याच्या मनांत संशय न राहावा ह्मणून दादासाहेब लागलेच दहापांच शागीर्द मात्र बरोबर घेऊन पालखीत बसून तुकोजीरावाकडे आले. तेव्हां तुकोजीरावास आनंद होऊन तो त्यास सामोरा गेला. नंतर उभयतांची भेट होऊन तुकोजीने दादासाहेबांच्या पायांवर डोके ठेविलें. दोघेही श्रमी झाले. मग लागलेच कुच करून दादासाहेबांसह तुकोजी इंदुरास आला. दादासाहेबांशी सलोखा होऊन त्यांची भेट झाल्यामुळे अहल्याबाईस समाधान वाटले. व विनाकारण रक्तपात न होऊ दिल्याबद्दल तिनें परमेश्वराचे आभार मानिले. नंतर आपल्या वाड्याशेजारीच दादासाहेबांचा डेरा देववून त्यांची तिने उत्तम बरदास्त ठेवविली.

 गंगाधर यशवंत यास आतां आपली मसलत आपल्याच अंगावर आली, व आपण सर्व जगांत कृतघ्न ठरलों असें पुरतेपणी कळून आले. मग त्याबद्दल त्यास पुरा पश्चात्ताप होऊन त्याने भगवी वस्त्र धारण केली व सर्व ऐहिक व्यवहार सोडून देऊन विरक्त होत्साता तो खानदेशांत अणकाईच्या डोंगरावर जाऊन बसला. तो मुळचा चांगल्या स्वभा-