पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[८५ ]


वाईट वाटून तिची पतीपाशी दाद लागण्याकरितां होईल तितका प्रयत्न करण्याचा तिचा निश्चय झाला व ती गोष्ट तिने आपल्या पतीस कळविली. मग काय, अगोदरच श्रीमंतांचा जो बेत ठरला होता त्यास स्त्रीचंही अनुमोदन मिळाले. तत्क्षणीच त्यांनी सांडणी स्वाराबरोबर असा हुकूम पाठविला की, अहल्याबाई ही योग्य स्त्री असून तिला आपल्या सासऱ्याच्या व पतीच्या दौलतीची वाटेल तशी व्यवस्था करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या तिच्या कृत्यांत जो आड येईल त्याचे रोग्य पारिपत्य करण्यास आम्हांकडून तिला सहाय होईल. अहल्याबाईने आपल्या राज्याची योग्य वाटेल तशी व्यवस्था करून आपले दोन वकील हुजुरांत पाठवावे. हा हुकूम वाचून अहल्याबाईला किती आनंद झाला असेल हे सांगावयास पाहिजे काय ? आपल्या राज्याच्या चिरस्थायित्वावर आलेले अरिष्ट खुद्द पेशवेसरकारांनींच निवारण केलें ह्मणून कृतज्ञतापूर्वक तिने त्यांचे आभार मानिले व तेव्हांपासून दिवाण गंगाधरपंताचा आणि राघोबादादाचा पुरा नक्षा उतरविण्याचा तिचा दृढ निश्चय झाला.

 इकडे आपले सर्व सरदार आपणास अनुकूल नाहीत असें दादासाहेबांच्या लक्षांत पूर्णपणे येऊन चुकले. आतां लढाई आरंभिली तर तुकोजी प्राण जाईपर्यंत आपली शिकस्त करण्यास मागे घेणार नाही व जरी जय मिळाला तरी याकामास खुद्द माधवरावांचे अनुमोदन नसल्यामुळे आपला इच्छीत हेतु सफल न होतां मल्हाररावांच्या ऋणानुबंधांत अंतर पडून स्त्रीशी युद्ध करण्याबइल अपयशाचा डाग मात्र लागेल. असा पोक्तपणाचा विचार करून केलेल्या कृत्याची योग्य संपादणी करण्याकरिता