पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ८४ ]
भाग आठवा.


तुमच्या आमच्या तलवारींची खडाजंगी उडेल याचा पुरा विचार करून पुढे पाऊल टाकावें.

 इतक्या निकरावर मजल येऊन ठेपेपर्यंत दादासाहेबांकडची सर्व व्यवस्था ठीक होती; पण हा निष्कारण आपआपसांत रक्तपात होणार असें या वेळी त्यांच्या शिंदे वगैरे सरदारांच्या मनांत येऊन त्यांनी लढाई सुरु करण्यास आपली नाखुषी दाखविली, व होळकरांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यास तयार झालेल्या गंगाधर तात्यास त्याच्या कृतघ्नतेबद्दल व त्यास सहाय करणाऱ्या राघोबास त्याच्या अन्यायाबद्दल उघड दोष देऊन ते ह्मणाले की, अशा नीच कृत्याबद्दल आमी साध्वी अहल्याबाईवर कधी शस्त्र धरणार नाही.

 राघोबाच्या सैन्यांत अशी फाटाफूट होते आहे अशा वेळी अहल्याबाईन माधवरावाकडे जो निरोप पाठविला होता त्याचा निकाल लागला. श्रीमंत माधवराव हे मोठे न्यायी व आपल्या सरदारांविषयी पूर्णाभिमानी असल्यामुळे होळकरांच्या गादीची वाटेल त्याप्रमाणे व्यवस्था करण्यास अहल्याबाईस पूर्ण अधिकार असणे हेच न्याय्य असें त्यांस वाटले, व या त्यांच्या विचारास आमच्या चरित्रनायिकेनें रमाबाईकडे जो वशिला लाविला होता त्याचे पाठबळ मिळून जोर आला. रमाबाई ही खरोखरच मोठी उदार अंतःकरणाची स्त्री होती, आणि तशांत ती महापतिव्रता असल्यामुळे श्रीमंत पेशवे हे तिच्या अगदी अर्ध्या वचनांत वागत असत. तिला आपल्या पदरच्या एका साध्वी स्त्रीवर अन्यायाने होत असलेल्या जुलमाबद्दल फार