पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[८३]

तिच्या आज्ञेप्रमाणे तो रात्रीचा दिवस करून सहावे रोजी फौजेसुद्धां इंदुरास येऊन दाखल झाला. तो येतांच अहल्याबाईस परमानंद होऊन मुहूर्त वगैरे कांहीं एक न पाहतां तिने त्याच दिवशी त्यास अभ्यंग स्नान घालून होळकराच्या गादीची वस्त्रे दिली, व तो मल्हारराव होळकरांच्या राज्याचा अधिपति ह्मणून सर्वत्र द्वाही फिरविली.

 इतक्यांत भोंसले व गायकवाड यांची वीस हजार फौज अहल्याबाईच्या सहायार्थ नर्मदातीरी येऊन दाखल झाल्याचे वर्तमान सांडणीस्वाराने येऊन सांगितले, व वरकड राजेरजवाड्यांकडून निरोप आले की, सुभेदारांचा ज्यावर उपकार नाही असा कोण आहे ? तुमचे प्रसंगास आम्ही जवळच आहों असें समजावें. हे वर्तमान ऐकून आपणास खचित या कार्यात दैव अनुकूल होणार अशी अहल्याबाईची खातरी झाली.

 अहल्याबाईने पाठविलेला निरोप राघोबादादांस पोंचला; पण राज्यलोभामुळे ज्याचे अंतःकरण विचारशून्य झाले त्यावर त्याचा काय परिणाम होणार ? त्याचा लढाई करण्याचाच निश्चय कायम होऊन तो क्षिप्रातीरी फौजेसुद्धा येऊन थडकला.

 आतां लढाई खास द्यावी लागणार असे समजून तुकोजीने अहल्याईच्या पायांवर डोके ठेवून लढाईस जाण्याची परवानगी मागितली व तिचा आशीर्वाद घेऊन तो स्वतःचे व मदतीस आलेले सर्व सैन्य बरोबर घेऊन निघाला, आणि त्याने राघोबास सांडणीस्वार पाठवून कळविले की, तुझी क्षिप्रा उतरल्यास