पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८०]
भाग आठवा.


थरावर गेली असें पाहून व आतां येथे राहिल्यास धडगत नाहीं असा विचार करून दिवाण गंगाधर यशवंत याने इंदुरांतून पाय काढिला व तो राघोबादादास जाऊन मिळाला.

 यानंतर घडलेल्या सर्व हकीकतीचं पत्र अहल्याबाईनें एका सरदाराच्या हाती त्या वेळी गादीवर विराजमान असलेले श्रीमंत माधवराव पेशवे यांस पाठवून त्यांस न्याय देण्याविषयी विनंति केली. त्यांची स्त्री रमाबाई मोठी सज्जन व उदार स्वभावाची आहे अशी तिची कीर्ति अहल्याबाईच्या कानावर गेलेली होती. साधारणतः पुरुषांपेक्षां स्त्रियांपाशी स्त्रियांची दाद लवकर लागते, कारण समजातीयांकडे परस्परांचा विशेष ओढा असतो, ह्यणून आमच्या चरित्रनायिकेनें कांहीं मौल्यवान् मोती व उत्तर हिंदुस्थानांत होणाऱ्या कांही उंची उंची वस्तू एका विश्वासूक दासीजवळ देऊन तिला आपल्या कार्यासाठी पुण्यास रमाबाईकडे पाठविलें, व आपल्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल खालील आशयाचे पत्र तिजजवळ देऊन ते तिला देण्यास सांगितलें.

 "श्रीमंत सौभाग्यवती भाग्यशालिनी रमाबाईसाहेब यांस-आपणांस प्राप्त झालेले ऐश्वर्य अखंडित राहण्याविषयीं श्रीजगदंबेची प्रार्थना करून चरणापाशी ही आपली आश्रित अनाथ स्त्री विनंति करीत आहे ती बाईसाहेब मान्य करतील अशी आशा आहे. श्रीमंतांच्याच कृपेनें सुभेदारांनी ऐश्वर्य संपादन केले व तें त्यांच्या घराण्यास निरंतर राहून त्यांचे नांव चिरकाल रहावें अशी पूर्वीच्या दोघां थोरल्या सरकारांची इच्छा होती असे असतां