पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[७७ ]


राज्याची व अधिकाराची वृद्धि केली व स्वतः आपण ऐश्वर्यलोभापासून दूर राहिला तोच हा राघोबादादा यावेळी आपल्या सुंदर, पण दुष्ट स्त्रीच्या कपटजालांत सांपडून आपल्या शौर्यास व भ्रार्तृप्रेमास कलंक लावण्यास, तसेंच कुटुंबांतील माणसांशी वैर जोडण्यास व आपल्या एकनिष्ठ सरदारांचा पाडाव करण्याकरितां पुढे परकीय लोकांस घरांत आणून त्यांकडून आपल्या वडिलांनी अविश्रांत पाणी घालून वाढविलेल्या पेशवाईरूप वृक्षाचा उच्छेद करण्यास कारण झाला ! त्याच्या स्त्रीने पेशवाईचा अर्धा वांटा आपणास असावा असे त्याच्या पुरें मनांत भरवून दिल्यावरून तो या वेळी गादीवर असलेला आपला पुतण्या माधवराव याशी द्रोह करूं लागला होता व एके वेळी त्याचा शत्रु निजाम याच्या सहायाने त्याशी लढाईसही आला होता; पण त्या शूर व चतुर माधवरावाने त्याचा लागलाच पराभव करून टाकिल्यामुळे तो तेथून निघून राज्यप्राप्तीच्या लोभाने उत्तरहिंदुस्थानांत आला. राघोबाची ही हकीकत या चरित्रांत अप्रासंगिक आहे, तरी त्याची पुढील कृति वांचून वाचकांस विस्मय न वाटावा ह्मणून ती आमांस देणे भाग पडले. दिवाण गंगाधर यशवंताचा खलिता वाचतांच राघोबादादास परमानंद होऊन तो होळकराचे राज्य बुडविण्यास तयार झाला व त्या आशयाचे त्याने दिवाणास उत्तर पाठविलें.

 या जगांत दैवाच्या दुर्विलासाचे वारंवार होणारे जे खेळ पाहण्यांत येतात त्यांचा नियमच असा असतो की, एकदा संकटे आली ह्मणजे ती एकामागून एक सारखी येतात. त्या वेळी आपणावर जे प्रेम करणारे असतात ते वैरी होतात, व ज्यावर