पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंत दादासाहेब पेशवे.

[७५ ]


रांतून आपले अंग काढून स्वस्थ बसली व गादीवर नामधारी एखादे पोर वसले म्हणजे आपली दिवाणगिरी कायम राहून राज्याची सर्व व्यवस्था आपल्या इच्छेप्रमाणे करितां येईल. हा त्याचा उद्देश त्याच्या हिताचा होता; पण तो कबूल करण्याइतकी आमची चरित्रनायिका मूर्ख नव्हती. तिला तो मुळीच पसंत पडला नाहीं; आणि तशांत लांच देऊन आपल्या गादीला वारस करून घेणे हे आपल्या कुलास लांछनास्पद आहे असे तिला वाटून तिने गंगाधर यशवंत यास साफ सांगितले की, माझा मुलगा मेला तेव्हांच होळकरांचा वंश खुंटला. आतां त्याच्या योग्य वारसांपैकी एकाची मी बायको व दुसयाची आई आहे, तर या नात्याने पुढची व्यवस्था वाटेल तशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे; त्या कामांत मी दुसऱ्याला कधी हात घालू देणार नाही, व दत्तक घेण्यासाठी लांच देणे मी कधीं कबूल करणार नाही. इतकें बोलून ती आणखी ह्मणाली की, एकादा अल्पवयस्क मुलगा मी दत्तक घेऊन तो गादीवर बसविला तर त्याच्या हातून राज्यकारभार कसा होणार व लोकांवर त्याची जरब तरी कशी बसणार ? यासाठी सुभेदारांनी मरणसमयीं माझ्या मुलाचा हात तुकोजीच्या हातांत घालून त्याला त्याचे रक्षण करण्यास व आपले वंशाचें नांव राखण्यास सांगितले होते, हे लक्षात आणले तर गादीचा मालक त्यास करण्याविषयी त्यांची मला आज्ञा आहे व त्याप्रमाणे तोच मालक होणे मलाही पसंत आहे. आपल्या दिवाणाशी अहल्याबाईनं याप्रमाणे भाषण केले व तुकोजीच्या नांवाची द्वाही फिरवून राज्यकारभार करण्याविषयी त्यास आज्ञा केली.
  एकादें अज्ञान पोर दत्तक घेऊन बाहुल्यासारखें गादीवर बसवून