पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७४ ]
भाग आठवा.


पराक्रमाची कीर्ति मात्र अवशिष्ट राहिली असती असें आह्मांस वाटते. हे आमचे अनुमान खरे आहे की चुकीचे आहे याचा पुढील हकीकतीवरून वाचकांस निर्णय करितां येईल.

 मालीराव होळकर मरण पावल्यावर मल्हाररावांच्या गादीस कोणी योग्य वारस न राहिल्यामुळे अहल्याबाईस व त्यांच्या पदरच्या सर्व सरदारांस आतां राज्याची व्यवस्था कशी करावी अशी मोठी पंचाईत पडली. कारण, मालीराव तिला एकटाच मुलगा होता तो वारला. बाकी राहिलेली कन्या मुक्ताबाई; पण हिंदुधर्मातील राज्यपद्धतीप्रमाणे तिला कोणत्याही प्रकारे राज्याचे आधिपत्य प्रात्प होणे बेकायदेशीर होते. अशा वेळी दिवाण गंगाधर यशवंत याने अहल्याबाईला अशी मसलत दिली की, माळव्यांत श्रीमंत रघुनाथराव पेशवे फौजेसुद्धा येऊन राहिले आहेत, तर त्यांस मोठा लांच देऊन त्यांकडून एखादे नातलगाचा लहान मुलगा दत्तक घ्यावा व त्याच्या नांवानें राज्य चालवावे. त्याने आणखी असेंही सांगितले की, तुह्मी जरी मोठ्या कर्त्या आहां तरी जातीने स्त्री असल्यामुळे राज्यकारभार चालविण्यास व लोकांवर दरारा बसविण्यास अयोग्य आहां; यासाठी सदहूंप्रमाणे व्यवस्था करून आपल्या खाजगी खर्चाकरितां बऱ्याच मोठ्या उत्पन्नाचा एकादा परगणा तोडून घेऊन दानधर्मात आयुष्य घालवीत खुशाल महेश्वरी जाऊन स्वस्थ बसा.

 दिवाण गंगाधर यशवंतानें अहल्याबाईला नी ही मसलत दिली त्यांत त्याचा असा हेतु होता की, ही बाई राज्यकारभा-