पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुत्रशोक.

[७१]

सासऱ्यांच्या आश्रयाखाली कांहीं समाधानाने दिवस काढले न काढले तो तेही सोडून गेले. आणि नंतर ज्याचें लालनपालन करून लहानाचे मोठे केले व जो आपल्या पित्याचे व कुळाचें नांव राखून मला सुख देईल असे वाटले होते तो पुत्रही आतां सोडून गेला. इतकेच नाही, तर ज्यांनी अनेक सायासांनी ही होळकराची गादी स्थापिली त्या मल्हाररावांचा आज निवंश झाला; आणि या सर्वांस कारण माझें दुर्दैव! असे वारंवार तिला वाटून ती शोकाकूल झाली.

 साध्वी अहल्येचा पुत्रशोक फारच अनिवार्य व हृदयद्रावक आहे. पण तो आमांस वर्णन करता येत नाहीं; कारण निरनिराळ्या दुःखप्रसंगांचे नवें नवें वर्णन देण्यास आमच्या भाषेत आतां शब्दच राहिले नाहीत. राहून राहून परमेश्वराच्या अथवा तिच्या दुर्दैवाच्या कृतीचे मोठे नवल वाटते की, कायावाचामनेंकरून परोपकारार्थ झटण्यास जी महासाध्वी अवतीर्ण झाली तिला आईबाप, पति, सासूसासरे आणि पुत्र या सर्वांच्या सहवाससुखापैकी एकही सुख फार वेळ मिळू नये अं! अथवा पुढे तिची दिगंत कीर्ति करण्याचा ज्या प्रभूचा हेतु होता त्याने तिच्या सद्गुणांची पुरी खातरी करून घेण्याचे मनांत योजिलें असेल; कारण अनेक भट्यांतून यत्किचित्ही डाग न लागतां जें सोने बाहेर पडते तेंच शुद्ध सोने होय. त्याप्रमाणे अनेक भयंकर दुःखांतून धैर्याने पार पडून जो आपले सद्गुण प्रकट करतो तोच मनुष्य परमेश्वराच्या कृपेस पात्र होतो. आमच्या चरित्रनायिकेची स्थिति अशीच झाली असेल. असो. यावरून आपणास इतकाच बोध घ्यावयाची की, जिच्यासारखी सर्व