पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६८]
भाग सातवा.


पल्या पुत्राच्या दुर्वर्तनास त्रासून अहल्याबाईनेच कांही प्रयोग करवून त्याचा अंत घडवून आणिला. ही वार्ता त्या वेळी सर्व हिंदु व परकीय लोकांस खरी वाटली व अद्यापि बहुतेकांचा इजवरच विश्वास आहे. आतां सकृदर्शनी ही बातमी ऐकून ऐकणारांच्या मनांत ' जिने धर्मासाठी प्रत्यक्ष आपल्या पोटच्या मुलाचा प्राण घेतला तिची योग्यता खचित फार मोठी आहे,' असे विचार येऊन ते तिची वाहवा करतील. आणि खुद्द साध्वी अहल्याबाईच्या नित्याचरणाकडे लक्षपूर्वक पाहिले तर, तिचा पुत्र वेडेपणाच्या लहरींत जी भयंकर कृत्यें करी ती पाहून तिला फार संताप येई व हा पुनः कधी शुद्धीवर येण्याची आशा नव्हती ह्मणून तिलाअत्यंत दुःख वाटे. तेव्हां आपल्या नांवलौकिकाकरितां, आपल्या राज्याकरितां, सर्व लोक करितां, फार काय सांगावें, खुद्द वेडेपणामुळे झालेल्या त्याच्या भयंकर स्थितीकरितां तो मेला तर बरें, असें खचित तिला वाटले असेल; तथापि स्वधर्मात सांगितलेलें यत्किंचितही पातक करण्यास जी महासाध्वी कधी प्रवृत्त झाली नाही, ती पुत्रहत्येचें भयंकर पातक आपऱ्या माथी मारून घेण्यास तयार होईल अशी आमची कल्पना धांवत नाही. या मरणासंबंधाने मुंबईचे माजी गव्हरनर सरजॉन् मालकमसाहेब यांनी फार बारिक रीतीने चौकशी करून जी हकीकत आपल्या पुस्तकांत दाखल केली आहे तीच खरोखरी घडलेली असावी असे आह्मांस वाटते. मालीरावाच्या तैनातीस अनेक दासी होत्या, त्यांतील एका सुस्वरूप व तरुण दासीबरोबर इंदूरशहरांतला कोणी जडिबुट्टी करणारा दोस्ती ठेवितो असे त्यास कोणी वर्तमान सांगितले, आणखी शिवाय असेंही कळविले